एटीएम
 
एटीएम केंद्राची यादी
क्रं. नाशिक मधील एटीएम केंद्र क्रं. नाशिक मधील एटीएम केंद्र
१. धनवर्धिनी २. सकाळ सायं.
३. सातपूर ४. पंचवटी
५. टिळकवाडी ६. गंगापूररोड
७. अंबड ८. रविवारपेठ
९. पवननगर १०. नाशिकरोड
११. आडगांव नाका १२. अशोका मार्ग
१३. मुंबई नाका १४. आनंदवल्ली
१५. म्हसरुळ १६. गोविंद नगर
१७. कॉलेज रोड १८. हनुमान वाडी
१९. मखमलाबाद २०. जुने नाशिक
क्रं. नाशिक बाहेरील एटील केंद्र क्रं. नाशिक बाहेरील एटील केंद्र
१. सायखेडा २. दिंडोरी
३. भगूर ४. पेठ
५. धुळे ६. वाशी
७. गोंदे दुमाला ८. त्र्यंबकेश्वर
९. देवळा १०. औरंगाबाद
११. घोटी १२. अभोणा
 

एटीएम सुविधा :

 पात्रता :

१) दि नासिक मर्चन्टस् को-ऑप. बँक लि., नाशिक च्या कोणत्याही शाखेमध्ये आपले बचत किंवा चालू खाते असणे आवश्यक आहे.

२) आपण आपल्या बचत खात्यात किमान रु. १०००/- व चालू खात्यामध्ये किमान रु. २०००/- ठेवणे आवश्यक आहे.

३) अर्जदार हा १८ वर्षांवरील हवा.

फी : एटीएम कार्ड घेण्याकरिता कोणत्याही प्रकारे शुल्क घेण्यात येत नाही. मात्र दुसऱ्या वर्षापासून वार्षिक देखभाल खर्च म्हणून रु. १००/- घेतले जातात.

 

 आवश्यक कागदपत्रे :

• रहिवासी दाखला (लाईट बिल/फोन बिल/घरपट्टी पावती/रेशनकार्ड)

• फोटो आयडी पुरावा (निवडणुक ओळखपत्र/पॅनकार्ड/पासपोर्ट/वाहन चालविण्याचा परवाना)

 अटी व शर्ती :

• सदरचे कार्ड हे बँकेची मालमत्ता आहे. व हे कार्ड कोणत्याही अटी व शर्ती विना परत घेऊ शकतो.

• कार्डवरील व्यवहार थांबविण्याचे अधिकार बँकेने राखून ठेवले आहेत.

• सदरचे कार्ड अहस्तांतरणीय आहे. व त्याचा वापर कार्डधारकानेच करावा.

• कार्डधारकाने एटीएम कार्ड विषयक सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करावयास हवे.

• एटीएम कार्डावरील होणाऱ्या व्यवहारास संपूर्णपणे जबाबदार हा एटीएम कार्डधारक राहील.

• कार्ड दिलेल्या तारखेपासून ५ वर्षांपर्यंत सदर कार्डची वैधता राहील.

• सदर कार्डचे नुतनीकरण हे बँकेच्या अटी व शर्तींनुसार करण्यात येईल.

• कार्डधारकाला एटीएम कार्डचा वापर करण्यासाठी चार आकडी पिन (पर्सनल आयडेंटीफिकेशन नंबर) नंबर देण्यात येईल. त्या पिन नंबरची सुरक्षिततेची जबाबदारी ही कार्डधारकावरच असेल. सदरचा पिन नंबर हा कार्डधारकास बदलता येवू शकतो.

• पिन नंबर विसरले असता कार्डधारकाने संबंधित शाखाधिकाऱ्यांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

• पिन नंबर हा नेहेमी गुप्त ठेवावा.

 एटीएम कार्डची वैशिष्ट्ये :

• फास्ट कॅश

• बॅलन्स चौकशी

• पिन नंबर बदलण्याची सोय

• निधी वर्ग करण्याची सोय

• रु. २५ हजारापर्यंत कॅश काढण्याची सुविधा

 

 

 कार्ड हरविल्यास / चोरीला गेल्यास / खराब झाल्यास :

• कार्डधारकाने त्वरीत शाखाधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे.

• कार्ड हरविल्यास / चोरीला गेल्यास त्याबाबतची तक्रार पोलिस स्टेशनला करणे आवश्यक आहे.

• नविन कार्ड मिळणेकामी रु. ३००/- शुल्क म्हणून भरावे लागेल.

 अधिक माहितीसाठी संपर्क :

 फोन नंबर ०२५३-२३०८२०० ते २०६

 
 
 
Top